Saturday, December 6, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

जैन हिल्स येथील राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेचा समारोप

by Divya Jalgaon Team
June 5, 2023
in कृषी विषयी, जळगाव, व्यापार विषयी
0
अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

जळगाव दि.३० प्रतिनिधी – नवीदिल्ली येथील अमितसिंग मेमोरियल फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टिम्स् लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेचा आज (ता. ३०) समारोप झाला. समारोप सत्रात देशभरातील २१ शेतकऱ्यांचा अमित उद्यान रत्न पुरस्कार – २०२३ ने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बिजय कुमार उपस्थितीत होते. त्यांच्यासोबत चाई (कॉन्फेडरेशन ऑफ हॉर्टीकल्चर असोसिएशन ऑफ इंडिया) चे अध्यक्ष डॉ. एच. पी. सिंग, सौ. बिमला सिंग, अमरेंदर सिंग, डॉ. बिर पाल सिंग, डॉ. एस. के. मल्होत्रा, डॉ. जे. एस., परिहार, डॉ. अनिल ढाके, डॉ. के. बी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला शहिद अमितसिंग यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते अॅवार्ड पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविक डॉ. के. बी. पाटील यांनी केले. त्यात त्यांनी १५ वी स्वदेशी जागृती संगोष्टी व अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशनविषयी माहिती दिली. डॉ. जे.एस. परिहार यांनी आभार मानले. सुत्रसंचालन डॉ. प्रज्योत नलिनी, डॉ. व्ही. आर. सुब्रम्हणिअम यांनी केले.

डॉ. एच. पी. सिंग यांनी राष्ट्रीय फलोउत्पादन परिषदेच्या तीन दिवसांच्या कामकाजाचे निष्कर्ष शेतकरी, अभ्यास व शास्त्रज्ञांसमोर मांडलेत. कृषी क्षेत्रात प्रिसीजींग फार्मिग किती महत्त्वाचे यावर त्यांनी प्रकाश टाकला. वारंवार होणाऱ्या वातारणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्तींना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पिकांचेही खूप नुकसान होत आहे. यासाठी संशोधकांनी नॅनो तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. यासाठी संशोधकांनी कमीत कमी कालावधीत संशोधनाला चालना दिले पाहिजे. शेतातील मुख्य पिकाची मूल्यवृद्धी करून नवीन उत्पादनांची श्रृखंला शोधली पाहिजे. शेतातील टाकाऊपासून काही टिकाऊ उत्पादन घेता येऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होईल अशा शिफारशी समोर आल्यात.

अमित सिंग उद्यान रत्न पुरस्कारार्थी
शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारचे पुरस्कार मानसन्मान केले जातात. त्यात देशभरातील खालील शेतकरी व शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात आला. सोनू निगम कुमार, आनंद कुमार ठाकूर,रामकिशोर सिंग मुजफरपूर, नारायण महातो रोसेरा बिहार, दत्तात्रय विठ्ठल माळी सोलापूर, ईश्वर सुदाम पाटील नंदुरबार, जगदीश बाबुलाल जाठ बडवाणी मध्यप्रदेश, रितेश प्रकाश पाटील बुऱ्हाणपूर, राज गोंडा पाटील सांगली, सौ. राजेश्री दिपक पाटील जळगाव, नारायण शशिकांत चौधरी यावल, रामदास त्र्यंबक पाटील जळगाव, मनोज जानरावजी जवांजल नागपूर, मयूरभाई कानाभाई पिंप्रोतर सुरेंद्रनगर गुजराथ, धर्मेंद्र सिंह विरेंद्रसिंह चौहाण नर्मदा गुजराथ, अण्णासाहेब हरीभाऊ माळी चांदवड नाशिक, राजू रामदास पाटील जामनेर, ईरण्णा डी. हल्ली बिजापूर, सौ. पुर्णा चेरल्ला विकराबाद तेलंगणा, अभिषेक आनंद सितामढी बिहार, जयपाल सिंग पानिपत हरियाणा यांचा अमित सिंग उद्यान रत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

Share post
Tags: # Jain Irrigation Systems Limited#Amit Singh Memorial Foundation#Amit Udyan Ratna Award#National Council of Horticulture
Previous Post

बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे

Next Post

५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

Next Post
५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

५ जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मराठी प्रतिष्ठान तर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group