Friday, December 5, 2025
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे

राष्ट्रीय फलोद्यान परिषदेतील दुसऱ्या दिवशी तज्ज्ञांचा सूर

by Divya Jalgaon Team
June 5, 2023
in कृषी विषयी, जळगाव, राष्ट्रीय
0
बदलत्या हवामानानुसार पीक पद्धती बदलणे गरजेचे

जळगाव, दि. २९ ( प्रतिनिधी) – केळी आणि बटाटा जागतिक पातळीवरचे महत्त्वाचे कृषी उत्पादन असून या दोहोंमध्ये भरपूर पोषणमूल्ये व खाद्यान्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येचा विचार करता जगाचे पोट भरण्याची क्षमता केळी, बटाट्यामध्ये आहे असा सूर केळी उत्पादकांच्या परिसंवादात तज्ज्ञांचा उमटला. केळीवर वातावरण बदलामुळे झालेले बदल तसेच बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे या विषयांवर तज्ज्ञांनी आपले मोलाचे विचार मांडले. जैन हिल्स येथे राष्ट्रीय फलोत्पादन परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी ‘केळीवरील रोगराई व्यवस्थापन कार्यशाळा व बटाट्याचे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मिती’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा पार पडली.

परिश्रम, कस्तुरबा हॉल, बडी हांडा व सुबीर बोस हॉल या चार ठिकाणी विविध विषयांवर शास्त्रज्ञ व अभ्यासकांनी संशोधन पेपर सादर केले. परिश्रम हॉलला सकाळच्या सत्रात केळीवरील रोगराई व्यवस्थापन व कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे अध्यक्ष अमितसिंग मेमोरियल फाउंडेशनचे तथा चाईचे अध्यक्ष डॉ. एच.पी. सिंग होते, को चेअरमन तिरुचिरापल्ली एनआरसीबीचे संचालक डॉ. आर. सेल्व्हराजन होते. डॉ. टी. दामोदरन, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. अनिल पाटील, के.बी. पाटील, केळी उत्पादक प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन हे व्यासपीठावर उपस्थित होते. केळीचे उत्पादन व त्यावर होणारा बदल्या हवामानाचा परिणाम, धोरणात्मक योजन, केळी कीड व रोग नियंत्रण, कार्यक्षम नवतंत्रज्ञान यावर तज्ज्ञांचे सादरीकरण झाले.

डॉ. टी. दामोदरन यांनी पनामा रोगाचे व्यवस्थापन व महाराष्ट्रात रोग येवू नये यासाठी काय खबरदारी घ्यावी यावर संबोधन केले. यात डॉ. आर. सेल्व्हराजन यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर केळीमध्ये भारत खूप मागे होता परंतु उच्च गुणवत्तेची टिश्युकल्चर रोपे जैन इरिगेशनसह काही मोजक्या कंपन्यांनी उपलब्ध करून दिले तसेच आधुनिक सिंचन व फर्टिगेशन तंत्रज्ञानामुळे चांगल्या दर्जाची केळी उत्पादन होत आहे. केळी पिकावरी कीड व रोगांचा सामना करण्याण्यासाठी व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे महत्त्वाचे विचार त्यांनी मांडले.

यावेळी प्रगतशील शेतकरी डी. के. महाजन, डॉ. एच.पी. सिंग, डॉ. प्रकाश पाटील यांनी देखील आपले मौलीक विचार मांडले. डॉ. सुरेश कुमार यांनी केळी प्रक्रिया उद्योगातील व्यवसाय व संधी, डॉ. के.जे. भास्करन यांनी केळी उत्पादनासाठी अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन व कॅलकुलेशन- माती परिक्षणानुसार व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. करपगम यांनी केळी निर्मिती व वापर, डॉ. एम. एस. सरस्वती यांनी केळी रोपांवरील संशोधन पेपर सादरीकरण केले. डॉ. लोगनाथन नवीन तंत्रज्ञानातून रोगाचे व्यवस्थापन यावरही मार्गदर्शन केले. डी. के. महाजन यांनी केळी पिकातील समस्यांवर संशोधन करून केळी उत्पादकांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे असे नमूद केले. के. बी. पाटील यांनी डि. के. महाजन यांच्या मनोगताचा हिंदी अनुवाद केला.

केळी परिषदेसाठी जळगाव, बऱ्हाणपूर, आनंद, बडवाणी, शिरपूर, सोलापूर येथील बिहार, उडिसा या राज्यातील केळी उत्पादक सहभागी झाले. प्रशांत महाजन, संतोष लवेटा, विशाल अग्रवाल, संदीप पाटील, योगेश पटेल, सचिन महाजन, महेंद्र सोलंकी, प्रेमानंद महाजन, आशुतोष पाटीदार, अशोक पाटीदार, जगदीश जाट, ईश्वर पाटील, पद्माकर पाटील, बापू गुजर यासह २५० शेतकरी सहभागी झाले होते.

Share post
Tags: #Banana Council#National Council of Horticulture#Tissue culture plantsjain irrigation
Previous Post

तायक्वांडो ब्लॅक बेल्ट परीक्षेत जैन स्पोर्टस् अकॅडमी तथा जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनचे २५ खेळाडू उत्तीर्ण

Next Post

अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

Next Post
अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group