नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अॅप गूगल पे (Google Pay) च्या अडचणी वाढणार आहेत. कारण, भारतीय प्रतिस्पर्धा आयोगा (CCI) ने गुगल पेविरोधात सविस्तर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गूगल पे हे एक प्रसिद्ध डिजिटल वॉलेट प्लॅटफॉर्म आहे. सीसीआयने दिलेल्या 39 पानांच्या आदेशात असं म्हटलं आही की, कंपनीने कायद्याच्या कलमांमध्ये विविध तरतुदींचं उल्लंघन केलं आहे.
या प्रकरणात महासंचालक (डीजी) यांच्यामार्फत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गूगल पेच्या संदर्भात कथित प्रतिस्पर्धीविरोधी व्यवहारासाठी ही तपासणी केली जात आहे. प्रतिस्पर्धा आयोगातील कलम 4 हे बाजारात आपल्या वर्चस्वाचा आणि प्रसिद्धिचा गैरवापर करण्यासंबंधी आहे.
नियामकांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Pay चं वर्तन अयोग्य असून तो बाजारात कंपनी इतर अॅप्समध्ये भेदभाव करते. यामुळे पे च्या प्रतिस्पर्धी अॅपला बाजार जागा मिळत नाहीये.
या 5 कंपन्यांविरोधात चौकशी होणार आहे
सीसीआय या प्रकरणी 5 कंपन्यांची चौकशी करणार आहे. यामध्ये अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगल आयर्लंड लिमिटेड, गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पाच कंपन्या आहेत. गुगल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि गुगल इंडिया डिजिटल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनींचे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.