जळगाव | राजकीय नेते समर्थक आणि जनतेशी संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करतात. मात्र काहीवेळा हेच समर्थक तर कधी संबंधित नेत्याला नेत्याला ट्रोल करण्यासाठी विरोधक या नेत्यांच्या नावाने बनावट अकाऊंट सुरू करतात. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या एकनाथराव खडसे यांच्या बाबतही अशाच काहीसा प्रकार घडला आहे.
एकनाथराव खडसे यांच्या नावाने एक ट्विटर अकाऊंट तयार करण्यात आलं होतं. याबाबत खडसे यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरून माहिती देत कारवाईचा इशारा दिला असून @EknathGKhadse हे अधिकृत अकाउंट असल्याचे सांगितलं आहे.
‘कुणीतरी खोडसाळपणे माझ्या नावाने @KhadseSpeaks हे ट्विटर अकाऊंट सुरु केले आहे, जे अनधिकृत आहे. याच्या संदर्भात रीतसर ट्विटरकडे तक्रार दाखल केली आहे. माझे अधिकृत अकाऊंट @EknathGKhadse हे असून त्याला 2 लाखांच्या वर फॉलोअर्स आहेत. कृपया याची नोंद घ्यावी.’ असे ट्विट एकनाथराव खडसे यांनी अधिकृत अकाऊंट वरून केले आहे.