जळगाव – शहरातील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या मोहिमेत सहभागी होत महाविद्यालयातील विविध विभागातील विद्यार्थी स्वयंसेवकांनी आज शिरसोली रोड परिसर, कृष्णा लॉंन परिसर, गणपती मंदिर परिसर व जकात नाक्याचा श्वास मोकळा केला. रस्त्याच्या शेजारी साचलेला प्लास्टिक, जैविक कचरा असा सुमारे ८ टन कचरा संकलित केला. त्यामुळे या परिसराचे रूप पालटले. चार तासांच्या या मोहिमेत १०० हून अधिक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वच्छता मोहीमेत सहभागी होत जी. एच. रायसोनी अभियांत्रिकी व व्यस्थापन महाविद्यालयाने जळगाव शहरातील विविध अस्वच्छ भाग स्वच्छ करण्याचा कृतिशील उपक्रम राबवण्याचा वज्रनिर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर जी. एच. रायसोनी महाविद्यालयाने शिरसोली रोड परिसर स्वच्छ करण्याचा निर्धार केला. सकाळी दहा वाजता रायसोनी महाविद्यालयापासून विद्यार्थ्यांनी ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ ही जनजागृती फेरी काढली.
रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्याहस्ते या फेरीचा प्रारंभ झाला. या अनुषंगाने शिरसोली रोडवर हि फेरी निघाली. जळगाव शहर स्वच्छतेचे आवाहन करत ‘चला जळगाव शहर, स्वच्छ करूया’ असा संदेश जनजागृती फेरीतून देण्यात आला. त्यानंतर शिरसोली रोड परिसर स्वच्छतेला सुरुवात झाली. येथील परिसरात कित्येक दिवसांपासून कचरा साचल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत होती.
पुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व जपत शिरसोली रोडसह जळगाव शहरातील विविध भागाच्या संवर्धनाची शपथ यावेळी विद्यार्थ्यांनी घेतली. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. वसिम पटेल, प्रा. राहुल त्रिवेदी व गांधी रिसर्च फाउंडेशनचे मदन लाठी, हेमंत बेलसरे हे या उपक्रमावेळी उपस्थित होते. उपक्रमाचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी यांनी कौतुक केले व भावी उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्यात.