जळगाव – महाविद्यालयीन जीवनात आपण कोणते करियर निवडावे या संभ्रमात आपण असतो . तुमच्या भविष्याला आकार देण्याचे व्यासपीठ महाविद्यालय आहे, याठिकाणी असलेल्या सुविधांचा तुमच्या ज्ञानासाठी उपयोग कसा करावा हे तुम्ही ठरवावे असे सकारातम्क जगावे असे मु.जे महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी पोलीस उपअधिक्षक संदीप गावित यांनी विचार मांडले. यावेळी मंचावर प्राचार्य डॉ. संजय भारंबे , संयोजक प्रा.किशोर महाजन ,प्रा.ए. पी. सरोदे ,कला शाखेचे भूपेंद्र केसुर, प्रा. जे.एन. चौधरी,प्रा.देवेंद्र इंगळे,डॉ.जगदीप बोरसे,सी ए अब्दुल कादिर आरसीवाला,डॉ.के.जी.खडसे उपस्थित होते.
बेस्ट स्टुडट पुरस्कार टाकळकर संयुजा शशिकांत,जिसन रफिक तडवी,मोक्षदा मधुकर चौधरी,कांचन लक्ष्मण पाटील या विद्यार्थ्यांना देण्यात आला. महाविद्यालयात आल्यावर आपण पारंपरिक शिक्षण घेतो. वार्षिक स्नेहसंमेलन हे व्यक्तिमत्व विकासाचे व्यासपीठ आहे. शैक्षणिक स्वायत्तता ही तुमच्या विषय निवडीचे स्वतंत्र निश्चित करते, या स्नेहसंमेलन व आठवणी तुम्हाला संकटाच्या व अडचणीच्या काळात प्रेरणा देतात यासाठी दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुख्य पाहुण्याचे मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात येते असे प्रा. संजय भारंबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. प्रा. किशोर महाजन यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. सुत्रसंचालन प्रा. योगेश महाले यांनी मानले.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.योगेश बोरसे,डॉ.संगीता पाटील,डॉ.अखिलेश शर्मा,प्रा.संगीता चंद्रात्रे,प्रा.प्रेमजित जाधव,डॉ.एल.पी.वाघ,डॉ.योगिनी राजपूत,प्रा.राहुल महिरे,डॉ.भाग्यश्री भालवतकर,प्रा.मनोज चोपडा, डॉ.कल्पना नंदनवार,प्रा.अनिल क्षीरसागर,प्रा.विजय लोहार,प्रा.के.के.वळवी,डॉ.कुणाल इंगळे,डॉ.आर.आर.अत्तरदे आणि प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
हाई झुमाकावली पोर .. हाई झुमाकावली पोर,झिंग झिंग झिंगाट यासारखी सदाबहार अहिराणी गीतांवर तरुणाईने ठेका धरला तर देशभक्ती गीतांवर भारत माता की जय चा जल्लोष केला.मू.जे.महाविद्यालयाच्या ‘वार्षिक स्नेहसंमेलनात सकाळी ९ वाजता गीत गायन स्पर्धेने सुरवात झाली . या स्पर्धे साठी रेडीओ मनभावन चे अमोल देशमुख व आर जे समृद्धी हे परीक्षक होते. नृत्य बक्षीस उत्तेजनार्थ एकल ओम माळी,दिव्या ओझा व तृतीय निकिता बाविस्कर ,नयना अग्रवाल,प्रथम माधवी पसारे,युगल नृत्य सना शेख,रानी चौबे,नयना अग्रवाल,वैष्णवी कोळी तसेच महाविद्यालयीन विविध शाखेत प्रथम आलेल्या ६५ विद्यार्थ्यानाचा प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला.