जळगाव – जळगाव तथा महाराष्ट्र कार्यक्षेत्र असलेल्या दि नाशिक मर्चन्टस् को -ऑपरेटिव्ह बँक लि. नाशिक (नामको बँक) सल्लागार पदावर अरविंद देशमुख याची नियुक्ती करण्यात आली.
अरविंद देशमुख हे नामको च्या जळगाव जिल्ह्यातील ग्राहक समितीवर काम करणार असून ग्राहकांच्या अडचणी सोडवण्यासाठी देशमुखांची मदत ही जळगाव जिल्ह्याला होणार आहे. त्यांच्या नियुक्तीचे पत्र नामदार गिरीश भाऊ महाजन व बँकेचे प्रकाश दायमा यांच्या हस्ते त्यांना नुकतेच देण्यात आले.
आरोग्यदूत अरविंद देशमुख यांची नुकतीच जळगाव दूध संघाच्या सुद्धा सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या निमित्ताने नामदार गिरीश भाऊ महाजन यांचे विश्वासू कार्यकर्त्याने सहकारात निवड होणे हि पक्ष व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारं आहे या निवडीबद्दल आरोग्यदूत अरविंद देशमुख यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.