जळगाव पाळधी – जागतिक महिला दिनानिमित्त पाळधी येथील सूर्या फाउंडेशन संचलित नोबल इंटरनेशनल स्कूल तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य वेशभूषा उत्सव सोहळा आयोजित करण्यात आले असून ही स्पर्धा दि. ८ मार्च रोजी श्री राम मंदिर पाळधी येथे ठेवण्यात आली आहे. यास्पर्धेत सोन्याची नथ, चांदीचा छल्ला ,पैठणीसाडीसह आकर्षक भेटवस्तू दिली जाणार असल्याची माहिती अर्चना सूर्यवंशी केले आहे.
तसेच या कार्यक्रमासाठी मॉ साहेब जिजाऊ वेशभूषा आणि झी टॉकीज कीर्तनकार माईसाहेब पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान बुधवार दि. ८ मार्च रोजी आयोजित करण्यात आले असून वेशभूषा स्पर्धा ही सकाळी १० ते १ या दरम्यान श्रीराम मंदिर सभागृहात पार पाडण्यात येईल. तसेच उत्कृष्ट वेशभूषेत पहिले पारितोषिक सोन्याची नथ, द्वितीय चांदीचा छल्ला, तृतीय पैठणी साडी भेट देण्यात येणार आहे तर संध्याकाळी ६ ते ८ वा. गांधी चौकात माईसाहेब पाटील यांचे शिवचरित्रावर व्याख्यान संपन्न होईल कार्यक्रमात सहभाग व उपस्थितीची चे आवाहन नोबल स्कूलचे संचालिका अर्चना सूर्यवंशी व प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.