जामनेर – अ.भा. हिंदू गोरबंजार लभाना नायकडा समाजाचा कुंभ 25 जानेवारी पासून गोद्री ता. जामनेर येथे सुरु असून दररोज कुंभात सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड वाढत आहे.
आज 30 रोजी कुंभाचा समारोप होणार असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे , उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस ,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , रामदेवबाबा व द्वारकापिठाचे शंकराचार्य सहभागी होणार आहेत.
24 रोजी कुंभ स्थळा पासून धर्म स्थळा पर्यंत शोभा यात्रा काढण्यात अली होती यात 50 हजारपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होत्ते. हेलिकॉप्टर द्वारे शोभा यात्रेत पुष्प वृष्टी करण्यात आली. 25 पासून महाराष्ट्र , कर्नाटक , मध्यप्रदेश , आद्र प्रदेश , तेलंगणा , गुजरात आदी राज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले . 28 रोजी मध्यप्रदेश मधून 800 वाहनांमधून 35 हजार भाविक रात्री दाखल झाले. रात्री 1 वाजता त्यांची भोजन व्यवस्था उत्तमरित्या झाली. कर्नाटक , तेलंगणा येथुनही हजरोंच्या वाहन संख्येत लाखो भाविक कुंभस्थळी दाखल झाले आहेत.
तसेच पंजाब , हरियाणा , यु.एस. ए . येथूनही भाविक दाखल झाले आहेत
दार दिवशी भाविकांच्या संख्येत 40 ते 50 हजाराने वाढ होत आहे. गोद्री सह आसपासच्या परिसराला मोठया यात्रेचे स्वरूप आले असून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे . आज 30रोजी सुमारे 2 लाखापेक्षा अधिक भाविक कुंभस्थळी येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 25 जानेवारीला रात्री अवकाळी पाऊस होऊनही 26 ला बहुसंख्येने भाविक कुंभस्थळी आले होते.