जळगाव – वाहतुक सप्ताह निमित्ताने महामार्ग केंद्र पाळधी यांच्यातर्फे जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग लगत असलेल्या शासकीय ITI कॉलेजमध्ये विद्यार्थ्याना व शिक्षक, शिक्षिकेत्तर कर्मचारी तसेच स्कूल बस चालकांना व वाहकांना वाहतूक नियमा बाबत मार्गदर्शन करून कायदेविषयक बाबी समजावून सांगितले.
यात डिवाइस चलन, मशीनची माहिती हेल्मेट वापरणे, सीटबेल्ट वापर, लेन कटिंग, रस्त्याच्या विरूद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रिपल सीट, मोबाईल फोन चा वापर करणे, वेगाने/अतिवेगाने वाहन चालविणे, सुरक्षितरित्या वाहन कसे चालवावे, याचे फायदे आणि नुकसान तसेच अपघात व अडचणीच्या परिस्थितीत कशी मदत करावी याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
सदर कार्यक्रमास API किरण बर्गे प्रभारी अधिकारी महामार्ग पोलीस केंद्र पाळधी यांनी वाहतुक नियम आणि अपघातग्रस्त व्यक्तीस मदत प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमास ITI चे प्राचार्य एस. एम. पाटील सर, दिपक कोळी सर, महामार्ग पोलीस विभागाचे NPC हेमंत महाडीक, NPC घनशाम पवार तसेच 300 ते 350 विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री उगले यांनी केले.