जळगाव – पाळधी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च विद्यालयात गुणवंत विद्यार्थी दिनेश सोनवणे हा जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्याच्यासह त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष मा. श्री. प्रतापराव गुलाबरावजी पाटील हे होते.
चोपडा येथील महाविद्यालयात जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यात भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला वाणीच्या विज्ञान उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी दिनेश सोनवणे यांनीही सहभाग नोंदवला व आपल्या नेत्रदीपक कामगिरीतून तो जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून घाघवित यश संपादन केले या अभिनव यशाबद्दल संस्थाध्यक्ष मा. श्री प्रतापराव गुलाबरावजी पाटील, विक्रमदादा गुलाबरावजी पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय श्री. डी. डी. कंखरे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. योगेश हरचंद करंदीकर, जेष्ठ शिक्षक श्री. उत्तम फासे सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या चिकित्सक व सद्विवेक बुद्धीला चालना मिळावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मा. श्री. प्रतापराव गुलाबरावजी पाटील यांच्या मार्गदर्शनातून व प्राचार्य श्री योगेश करंदीकर सर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण व्हावा व जास्तीत जास्त विद्यार्थी बौद्धिक खेळ खेळणारे निर्माण व्हावेत याकरिता गुणवंत विद्यार्थ्यांसह त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. आपल्या कार्यातूनही आपल्या पालकांचा सत्कार व्हावा यासाठी विद्यार्थी प्रेरित होऊन अधिकाधिक सहभाग नोंदवतील अशी भावना मा. श्री. प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी अध्यक्ष मनोगतात व्यक्त केली.
कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमतः जीपीएस कॅम्पस विद्यार्थी जिल्हा स्तरावरील स्पर्धेत सहभागी झाले होते त्यात प्रथम प्रयत्नातच नेत्रदीपक कामगिरी करणारे विद्यार्थी पहिल्या बॅच मधूनच तयार होत आहेत व ही परंपरा अशीच कायम राहील व विद्यार्थी तिला निरंतर अशाच प्रकारचे यश संपादन करून ही परंपरा सुरू ठेवतील अशी अपेक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री. योगेश करंदीकर सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.
सत्कारार्थी विद्यार्थी दिनेश सोनवणे यांने आपल्या मनोगत हातून प्रथम प्रयत्न मा. प्राचार्य श्री. योगेश करंदीकर सर यांनी दिलेल्या अनमोल मार्गदर्शन यासह ज्येष्ठ शिक्षक फासे सर प्राध्यापक संजय बावस्कर यासह सर्व प्राध्यापकांचे आभार मानून आपल्या यशाचे श्रेय कॉलेजला देऊन आपली कृतज्ञ भावना व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भूषण पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. मोनिका पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.