जळगाव- युवा प्रेरणा फाउंडेशन तर्फे शिरसोली रस्त्यालगत असलेल्या निराधार वस्तीत दिवाळी निमित्त ८० घरांना फराळ वाटप करण्यात आला ,तसेच रोज गरजू लोकांना जेवण वाटप करणाऱ्या दि एंजल फूड फाउंडेशनच्या सदस्यचा सत्कार आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. दिवाळीत फटाके न फोडता प्रदूषण मुक्त करण्याची शपथ सर्व सदस्यांनी प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित घेतली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आमदार राजू मामा भोळे , नगरसेवक सुनील खडके , नगरसेवक महेश चौधरी , सुशील हासवणी , प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील , प्रभाग समिती सदस्य अनिल जोशी , संजय लुला , प्रवीण पाटील, शक्ती महाजन , अमोल कोल्हे , राहुल वाघ , आनंद सपकाळे , जितू चौथे , गणेश चौधरी , गजानन , योगेश बागडे, अक्षय जेजुरकर ,युवा प्रेरणा फाऊंडेशनचे विक्की सोनार , आकाश पाटील , उपस्थित होते. सुत्रसंचलन श्री मनोज परदेशी यांनी केले, सर्व मान्यवरांनी फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.