जळगाव – रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शहरातील इंद्रप्रस्थ नगरातील खडके चाळ येथे चॉपरने भुषण भरत सोनवणे याचा निर्घृण खून केल्याची घटना घडली. आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी नगरातील इंद्रप्रस्थ नगरातील रिक्षा थांब्यावर भूषण भरत सोनवणे सोनवणे उर्फ अठ्ठा (३०, रा. इंद्रप्रस्थनगर) हा संशयित आरोपी प्रतिक निंबाळकर (वय-२४, शिवाजी नगर), अतुल ज्ञानेश्वर काटकर (वय-२९, शाहु नगर) आणि दुर्गेश उर्फ पपई आत्माराम अन्सार (वय-२५, रा. गेंदालाल मिल) यांच्यासोबत दारू प्याला. हे चौघे उभे असतांना अतुल, प्रतिक आणि भूषण यांच्यात किरकोळ वाद झाला. भूषणने शिवीगाळ करून प्रतिकच्या कानशिलात मारली. याचा राग आल्याने प्रतिकने त्याच्या कमरेतील चॉपर काढून भूषणच्या पोटात, मानेत, छातीत वार करून खूपसले. त्यानंतर अतूल काटकने प्रतिकच्या हातातील चाकू घेवून भूषणवर वार करत निर्घृण हत्या केली. यात भूषण जागीच ठार झाला.
मुलाला मारहाण करत असल्याची माहिती मयत भूषणची आई तिरोना सोनवणे यांना समजले. नातेवाईकांसह घटनास्थळी धाव घेतली असता मुलगा रक्तबंबाळ स्थितीत पडलेला दिसून आला. भूषण जवळ येताच मोरकरी तिघांना पळ काढला. तिघांचा काही तरूणांनी पाठलागही केला मात्र सापडले नाही. मुलगा ठार झाल्याचे पाहून आईने मृतदेहाजवळ हंबरडा फोडला होता. मयत भूषणच्या आईच्या फिर्यादीवरून प्रतिक निंबाळकर, अतुल काटकर आणि दुर्गेश अन्सार यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय येरूळे हे करीत आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पो.कॉ. तेजस मराठे आणि योगेश इंधाटे यांना दोन संशयित आरोपींची गोपनिय माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ अतुल काटकर याला शाहुनगरातील राहत्या घरातून अटक केली. त्यानंतर अर्ध्यातासानंतर संशयित आरोपी प्रतिक निंबाळकर हा बहिणाबाई गार्डनजवळ असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पो.कॉ. तेजस मराठे यांनी बहिणाबाई गार्डन येथून रात्री १२.३० वाजेच्या सुमारास ताब्यात घेतले. तर तिसरा आरोपी दुर्गेश अन्सार याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अटक केली आहे. आज तिघांना जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.