जळगाव- खान्देश मराठा कुणबी वधुवर परिचय गृपचे संस्थापक अध्यक्ष तथा वावडदा ता.जळगाव येथील गौरी उद्योग समुहाचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्था,जळगाव यांच्यावतीने २०२०-२१ यावर्षाचा “समाजभूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
बापूसाहेब सुमित जानकीराम पाटील यांनी आजवर खान्देश मराठा कुणबी समाज वधुवर ग्रुपच्या माध्यमातून पाचहजार पेक्षा जास्त विवाह जुळवले आहेत,
या कार्यासाठी त्यांना समाजभूषण पुरस्कार देण्यात आला असे राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सौ.संदिपा वाघ यांनी सांगितले.