जळगाव– आदिवासी भिल्ल समाजाच्या व्यक्तींना मिळालेली इनामी जमीन एरंडोल प्रांतधिकाऱ्यानी आम्हाला कुठलीही नोटीस न देता अवघ्या ७ दिवसात परस्पर पाटील कुटुंबियांच्या नावावर केल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या तक्रारीची अपर जिल्हाधिकारींनी गंभीर दखल घेत चौकशीचे आश्वासन दिले आहे. या जमिनीची किंमत लाखोच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, एका पिडीतने पारोळा पोलीस स्थानक तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद देऊन देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.भिल्ल बांधवांची इनामी जामीन परस्पर केली नावावर.
या प्रकरणाची तक्रारदार कैलास भिल, सचिन भिल, रघुनाथ भिल, शोभाबाई भिल (सर्व रा. कराडी ता.पारोळा) यांनी आपल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे की, आमचे पणजोबा कैं. हरी कमल भिल यांना सरकार तर्फे १९६३ झाली जुना सर्वे नंबर १०१ म्हणजेच आताचा गट क्रमांक ९१ मिळकत क्षेत्र ३ हेक्टर ४० आर आकार ८.३५ पैसे हे शेत सरकारी पडीत आकरी असल्याने व आम्ही भिल्ल आदिवासी असल्याने शासनाने अलोट कसून खाण्यास दिलेली होती. सदर मिळकतीचा आमचे पणजोबा हरी भिल यांच्यापासून ते आमचे आजोबा अभिमान हरी भिल यांच्या नावे पिक पेरा लागत होता व चालू होता. सदरचा पिक पेरा १९९४ पावतो अभिनव भिल यांच्या नावे होता. परंतू नंतर सदरची शेतजमीन आमच्या ताबे कब्जा उपयोगात असून आमच्या नावाचा पिक पेरा लागणे बंद दिसून येत आहे.
तसेच मारहाण आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार विश्वनाथ फुला भिल यांनी पारोळा पोलीसात तसेच पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पुंडलिक नथ्यू पाटील, रोहिदास शांताराम पाटील, रामकृष्ण पुंडलिक पाटील व इतर दोन महिलांनी ३१ ऑक्टोबर रोजी गावाच्या बस स्थानकावर अडवून शेतात पाय ठेवला तर तुमच्या त्याच शेतात मूडदा पाडू अशी धमकी देत जाती वाचक शिवीगाळ केली. याबाबत तक्रार देऊन देखील अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.
अजून वाचा
जळगावात ठाकरे सरकार जबाबदार म्हणत कंडक्टरने केली आत्महत्या