जळगाव – जळगाव शहर आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत असलेल्या मनोज अनिल चौधरी यांनी आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे की, “माझ्या आत्महत्येस एसटी महामंडळाची कार्यपद्धती व मराठी माणसाचे ठाकरे सरकार जबाबदार आहे.” असा खळबळजनक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.
जळगाव आगारात वाहक म्हणून कार्यरत असलेले मनोज अनिल चौधरी हे मागील काही दिवसांपासून कमी पगार व त्यातील अनियमिततेला कंटाळून नैराश्येत गेले होते. आज सकाळी त्यांनी आत्महत्यापूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता याच कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.
यास जबाबदार एसटी महामंडळाची कार्यपद्धती व आपल्या मराठी माणसाचे ठाकरे सरकार (शिवसेना) आहे. माझ्या घरच्यांचा यात काही संबंध नाही. संघटनांनी माझा पीएफ व एलआयसी माझ्या परिवारास मिळून देण्यासाठी प्रयत्न करावा, असे म्हटले आहे. दरम्यान, संतप्त नातेवाईकांनी महामंडळाचे अधिकारी येऊन आश्वासन देत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेतला आहे.