जळगाव – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात दि.२० ते २२ नोव्हेंबर दरम्यान केंद्रीय क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.
त्यात मुळजी जेठा महाविद्यालय अभ्यासकेंद्रातील भावेश विसपुते या द्वितीय वर्ष बीए वर्गातील विद्यार्थ्याने 400 मीटर रिले या क्रीड़ा प्रकारात सहभागी होवून प्रथम क्रमांक पटकावला. याआधी भावेश याने मुक्त विद्यापीठाच्या विभागीय क्रीडा महोत्सवाच्या 100 मीटर तसेच 400 मीटर रिले मध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता व त्यातून त्याचे केंद्रीय क्रीडा महोत्सवासाठी निवड करण्यात आली होती. या यशाबद्दल त्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.एन.भारंबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभ्यासकेंद्राचे केंद्रसंयोजक डॉ.ए.पी.सरोदे, डॉ. जुगलकिशोर दुबे महाविद्यालयाचे संचालक डॉ.देवेंद्र इंगळे व डॉ.भूपेंद्र केसुर आणि केंद्रसहायक प्रवीण बारी उपस्थित होते.