जळगाव – कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देवानंद वाघ यांना राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ नुकतेच कोल्हापूर येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनाचे उद्घाटन दीपक केसरकर शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या अधिवेशनासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे रवींद्र पालवे कार्याध्यक्ष तसेच नामदेवराव कांबळे महासचिव व सरचिटणीस आकाश तांबे अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे यांची खास करून उपस्थिती होती. या अधिवेशनात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक कार्यात उत्तम असं कार्य करणाऱ्या राज्यभरातील २० आदर्श शिक्षकांना महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ देऊन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुका येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक वराड शाळेचे आदर्श शिक्षक देवानंद यशवंत वाघ यांना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण कार्यक्रमास व अधिवेशनासाठी माजी शिक्षण संचालक महावीर माने, नाशिक विभागीय अध्यक्ष महेश अहिरे, कार्याध्यक्ष वंदना भामरे नगरसेवक धुळे,जळगाव जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे, कार्याध्यक्ष किशोर साळुंखे तालुकाध्यक्ष भरत भिमराव शिरसाठ,नितीन सोनवणे(जळगांव), प्रदिप वाघ(चाळीसगांव) संघटक संजय साळुंखे,अकबर तडवी यांची उपस्थिती होती.
पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक देवानंद यशवंत वाघ यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उत्तम काम आहे. अगोदर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा ६ वर्ष शैक्षणिक कार्य उत्तम केले आहे. ते चोपडा तालुका भारतीय बौद्ध महासभा व कास्ट्राईब शिक्षक संघटनेत चांगले कार्य करतात.
तसेच प्रभाकर पारवे, बापू साळुंखे,नगरसेवक अशोक बाविस्कर, रमेश शिदे,मिनाताई शिरसाठ,हितेंद्र मोरे,बापूराव वाणे,भरत शिरसाठ, छोटुभाऊ वारडे, आधार पानपाटील, बापू बहारे, अकबर तडवी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्यात.