पाळधी – पाळधी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माध्यमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सुजाता वाघोदे व इंग्रजी माध्यमाच्या जयश्री चौधरी उपस्थित होत्या. जीपीएस स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील व प्रमुख पाहुण्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून संविधानाचे पूजन केले.
याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी इंग्रजी,मराठी तसेच हिंदी भाषेतून संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. शाळेचे क्रीडा शिक्षक राकेश धनगर यांनी संविधानाविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली. संविधान हे घरात ठेवून पूजन करण्यासाठी नव्हे तर त्याचे वाचन करून आचरणात आणण्यासाठी आहे असे प्रतिपादन प्राचार्य सचिन पाटील यांनी केले.
सदर कार्यक्रम प्रसंगी 26/11 च्या आठवणींना उजाळा देत, देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. सदर कार्यक्रमाला जीपीएसचे सर्वेसर्वा प्रतापराव गुलाबरावजी पाटील, प्रमुख पाहुण्या सुजाता वाघोदे, जयश्री चौधरी , जीपीएसचे प्राचार्य सचिन पाटील तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.