जळगाव – भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल पाळधी या ठिकाणी व्यसनमुक्ती या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली, शाळेच्या कलाशिक्षिका प्रीती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेत भाग घेतला.
चित्रकला स्पर्धेसोबतच व्यसनमुक्तीचे दुष्परिणाम यावर विद्यार्थ्यांमार्फत नाटिका सादर करण्यात आली. सुदृढ शरीरात सुदृढ मनाचा वास असतो, समाजातील तरुणांनी दारू पिऊन गटारीत लोळण्यापेक्षा दूध पिऊन आखाड्यात खेळणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष प्रतापराव गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.
सदर कार्यक्रमाला जीपीएस चे कार्याध्यक्ष प्रतापराव पाटील,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य सचिन पाटील , शाळेच्या कलाशिक्षिका प्रीती चौधरी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
व्यसनमुक्ती विषयावरील चित्रकला स्पर्धेचा निकाल
तन्मय उमेश पाटील – प्रथम क्रमांक
कीर्ती योगेश पाटील – द्वितीय क्रमांक
कृतिका संदीप पाटील – तृतीय क्रमांक
यथार्थ दीपक पाटील – उत्तेजनार्थ प्रथम
साई जगदीश जाधव – उत्तेजनार्थ द्वितीय