जळगांव – जळगांवकरीता अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या जळगांवचे क्रिएटिव आणि जिनियस आर्कीटेक्ट संदीप सिकची यांना ग्लीट्स मॅगझीन पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
दिल्ली येथील हाॅटेल ललीत येथे झालेल्या दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा नामांकीत पुरस्कार एचओडी डीपार्टमेंट आॅफ आर्किटेक्टचर स्कुल आॅफ प्लॅनिंग अॅन्ड आर्कीटेक्चर, न्यु दिल्ली चे अनिल धवन यांच्या शुभहस्ते देण्यात आला. ते या पुरस्कारातील नऊ जुरीं पैकी एक मान्यवर जुरी होते. अशी माहिती आर्कीटेक्ट शिरीष बर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे येथील नंदकिशोर राठी यांनी त्यांच्या ‘आॅफीस अॅट आमराई’ या आॅफीसचे काम संदिप यांना दिले. संपुर्ण काम पर्यावरणाची हानी न होऊ देता, जागेचा योग्य वापर, क्रिएटिविटी, बांधकामात स्थानिक वस्तुंचा वापर, त्यातील तंत्रज्ञान, यावर आधारीत संपुर्ण काम केले असल्याने त्याची दखल ग्लीट्सने घेतली व त्यांना नामांकित करुन सम्मानित करण्यात आले. सात कॅटेगरी मध्ये २००+ एन्ट्रीमधुन ‘आर्कीटएक्चर – आॅफीस अँड रिटेल’ कॅटेगरीच्या पुरस्काराकरीता आर्कीटेक्ट संदिप सिकची यांना सन्मानीत करण्यात आल्याचेही शिरीष बर्वे यांनी सांगितले.
संदिप यांचे शालेय शिक्षण सेंट जोसेफ स्कुल, महाविद्यालयीन शिक्षण एम जे काॅलेज व त्यानंतर एम एम काॅलेज आॅफ आर्किटेक्टचर,पुणे तसेच सी ई पी टी काॅलेज अहमदाबाद येथे झाले. त्यानंतर त्यांनी दोन वर्ष बैंगलोर येथे नोकरी केली. पुण्यात १९९६ स्वत:चे आॅफीस केले. पण डाॅ. चंद्रशेखर सिकची यांचे जळगांवला वलय चांगले असल्याने आई वडीलांना पुण्यात बोलावण्यापेक्षा तेच जळगांवला आले व येथुन काम सुरू केले.
आर्किटेक्ट संदिप सिकची यांनी जळगांवसह मुंबई, पुणे, बेंगलोर व्यतीरीक्त परदेशात चायनात आॅफीस, हाँगकांग येथे रेस्टोरेंट, ची कामे केली असुन सध्या आॅस्ट्रेलिया येथे त्यांच्या मार्गदर्शनात बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे चित्रपट अभीनेत्री प्रियंका चोपड़ा यांच्या घर, आॅफीस व वडीलांच्या मेमोरियल ट्रस्ट चे देखिल काम आर्कीटेक्ट संदिप सिकची यांच्या मार्गदर्शनात झाले आहे.
संदिप यांना या आधि देखिल अनेक पुरस्कार व सन्मान मिळाले असुन त्यात आर्टिस्ट इन काँक्रीट अॅवाॅर्ड: २०१३, फिफ्टी ब्युटीफुल हाऊसेस इन इंडिया या काॅफीटएबल बुक मध्ये देखील संदिप त्यांच्या तीन प्रोजेक्ट्सचा समावेश आहे. कंस्ट्रक्शन वीक अॅवाॅर्डस् मध्ये देखील त्यांचे नामांकन घोषित झाले आहे.
काम करताना क्लाइंट रिक्वायरमेंट, डिझाइन, बजेट नुसार काम तसेच वास्तुशास्त्र व तंत्रज्ञानाची सांगड घालुन काम करण्याची आवड असल्याचे आर्कीटेक्ट संदिप सिकची यावेळी नमुद केले.
यावेळी डाॅ चंद्रशेखर सिकची यांच्या देखिल कार्याबद्दल त्यांना इंडियन अॅकॅडमी आॅफ पेड्रीअॅटईक तर्फे मिळालेल्या जिवन गौरव पुरस्काराची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला आर्कीटेक्ट शिरीष बर्वे, डाॅ चंद्रशेखर सिकची, आर्कीटेक्ट संदिप सिकची, आर्कीटेक्ट आदित्य सिकची उपस्थित होते.