जळगाव – सकल मराठा समाज साखळी उपोषण आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची उपोषण स्थळी भेट बकालेच्या अटकेसाठी सकल मराठा समाज जळगाव जिल्हा आज एकत्र आला असुन जिल्हाधिकारी कार्यालया समोर आज या साखळी उपोषणाचा ४ था दिवस आहे या साखळी उपोषण आंदोलनाला आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी या साखळी उपोषण स्थळी भेट देऊन यावर चर्चा केली तसेच या बकालेच्या अटकेसाठी व बडतर्फी करिता शासनाकडे पाठपुरावा करतो असे सांगितले आणि व या साखळी उपोषण आंदोलनाला पाठिंबा दिला
तसेच जळगाव शहर व जिल्ह्यातील इतर तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.बेताल बकाले हा गेल्या ३० दिवसापासून फरार असून त्याला आजपर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये. त्यासाठी प्रशासनाच्या विरुद्ध आज विविध समाज व संघटनांनी प्रत्यक्ष भेट व पाठिंबा दर्शविला. या साखळी उपोषणाला बहुसंख्य संख्येने उपोषणाला बसले आहेत.या बेताल बकालेला अटक होण्यासाठी व सेवेतून कायम बडतर्फ करण्यासाठी सदर सकाळी उपोषणाला सकल मराठा समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेले आहे. जोपर्यंत त्याला बडतर्फ व अटक करण्यात येत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण चालू राहणार आहे त्यानंतर सदर प्रशासनाने त्यास लवकरात लवकर अटक व बडतर्फ न केल्यास मोठ्या संख्येने मराठा समाज आत्मदहन करणार व जळगाव जिल्हा स्तरावरील मोठ्या मोर्चाचे आयोजन लवकरच करेल व पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.