जळगाव – राज्य शासनाने रेशन कार्ड धारकांना १०० रुपयांमध्ये रवा, चनाडाळ, साखर, पाम तेल या वस्तु देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अनेक कार्ड धारकांकडे अद्यापही रेशन कार्डचा बारा अंकी क्रमांक नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांकडे आलेला माल वितरीत होऊ शकत नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांना या ‘दिवाळी किट’चा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, अशोक लाडवंजारी, राजू मोरे, सुनील माळी, इब्राहिम तडवी, अशोक सोनवणे, एस.जे. पाटील, संजय पाटील, अमित तडवी, डॉ. रिजवान खाटिक, रहीम तडवी, संजय पाटील, साजीद शेख, खलील शेख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आणि पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. त्यात त्यांनी जिल्ह्यातील पुरवठा प्रणालीत असलेल्या अडचणींबाबत चर्चा केली आहे. त्यात पॉस मशिनची तांत्रिक अडचण, पुरवठा प्रणालीत सातत्याने येत असलेल्या अडचणी दूर करण्याची मागणी करण्यात आली.
महामार्ग दुरुस्तीची मागणी
जळगाव शहरातून जाणारा कालिंका माता मंदिर ते खोटे नगर हा महामार्ग आताच तयार झाला आहे. तरीही त्यात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यासोबतच शिव कॉलनी येथे अंडरपास तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी मित्तल यांच्याकडे करण्यात आली.