पाळधी – भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती कार्यशाळा संपन्न’ झाली.
पाळधी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील कला, वाणिज्य व विज्ञान उच्च महाविद्यालयात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे अंधश्रद्धा निर्मूलन यावर वैज्ञानिक दृष्टिकोन कसा विकसित करावा व अंधश्रद्धेपासून आपणास कसे आली तर ठेवावे यासंदर्भात कनिष्ठ महाविद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे जळगाव जिल्हा संघटक विनोद सपकाळे , पथराड येथील प्रगतशील शेतकरी नामदेव शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विनोद सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या समाजात अंधश्रद्धा कशी पसरते व आपण त्याला कसे बळी पडतो हे जादूटोण्याचे प्रयोग व हातचलाखी कशी असते हे विद्यार्थ्यांना अनेक प्रयोगांच्या माध्यमातून दाखवले ज्यात मांत्रिक कशाप्रकारे तांब्यात भूत पकडणे, मंत्रांनी यज्ञ पेटवणे, पाण्याने दिवा पेटवणे असे विविध प्रयोग करून दाखवून विद्यार्थ्यांच्या मनामधील शंका दूर करून त्यामागील वैज्ञानिक कारणे विद्यार्थ्यांना समजून सांगितले.
प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक शंकाकुशंका दूर केल्या . याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब प्रतापरावजी गुलाबरावजी पाटील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री डी. डी.कंखरे , कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर हे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भुषण पाटील सर यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर यांनी स्वतःचे अनुभव कथन करून आपण अंधश्रद्धेला सहज बळी कसे पडतो हे समजून सांगितले केले. संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या काळात विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन शिक्षणच आपल्याला या अंधश्रध्देच्या गर्तेतून बाहेर कसे काढते हे समजून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. मोनिका पाटील मॅडम यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.