जळगाव – एस. एस. मणीयार विधी महाविद्यालयात आयक्यूएसीच्या वतीने धर्मनिरपेक्षतेवर चर्चासत्र घेण्यात आले. चर्चासत्रास प्रमुख वक्ते म्हणून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस (Sanatan Sanstha National Spokesperson Chetan Rajahans) हे लाभले होते. यावेळी मंचावर सनातन संस्थेचे नंदकुमार जाधव, प्राचार्य डॉ. बी. युवकुमार रेड्डी, चर्चासत्र समन्वयक डॉ. रेखा पाहुजा उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना राजहंस यांनी भारतीय राज्यघटना ही एक जगातील आदर्श राज्यघटना असल्याचे सांगत धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाची मांडणी केली. धर्मनिरपेक्षता भारतीय संविधांनाच्या मूलभूत ढाच्याचा भाग आहे मात्र राज्यकर्त्यांनी त्याचा त्यांना हवा तसा सोयीचा अन्वयार्थ लावल्याची खंत व्यक्त केली. हिंदू विवाह कायदा नुसार जैन, सिख, बौद्ध यांना हिंदू धर्माचा भाग मानले होते मात्र अल्पसंख्य म्हणून त्यांना हिंदू पासून विलग केल्याचे स्पष्ट केले. सेकूलर या शब्दाचा भाषागाणिक वेगळा अर्थ लावला जातो पण आधीकृत असा त्याचा अर्थ उपलब्ध नसल्याचे सांगितले. शेवटी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
तत्पूर्वी प्राचार्य डॉ. रेड्डी यांनी भारतीय समाज आणि संविधान संदर्भात मार्गदर्शन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, वाक्त्यांचा परिचय आणि शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. रेखा पाहुजा यांनी मानले.