जळगाव – नवरात्री उत्सवानिमीत्त नवीन विचारांचा जागर करण्याच्या दृष्टीने नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड नॅपकिन(Sanitary Pad Napkin) चे वाटप राज माध्यमिक विद्यालय मेहरुण (Mehrun)येथे करण्यात आले.
याप्रसंगी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सारिका पाटील ह्यांनी किशोरवयीन मुलींना मासिक पाळी (Menstrual cycle) या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्या काळात घ्यावयाची काळजी तसेच वापरावयाची साधने तसेच आरोग्य या विषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी महापौर जयश्रीताई महाजन या उपस्थित होते. यावेळी प्रत्येक किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले. याप्रसंगी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी अध्यक्ष मनिषा पाटील, श्रीमती ज्योती राणे, किमया पाटील, माधुरी शिंपी, संगिता चौधरी, डॉ नीलिमा सेठीया सरोज पाटील आशा पाटील स्नेहल तडवी ज्योती पाटील डिंपल येवले अश्विनी फालक भामरे उपस्थित होते.