जळगाव प्रतिनिधी – जळगाव मेहरून येथील यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीची विद्यार्थीनी कु. कोमल शांताराम माळी हिस राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक भुसावळ येथील नारखेडे विद्यालय व महाविद्यालयात आयोजित स्वर्गीय बाबासाहेब के.नारखेडे स्मृतीदिन निमित्त मिळालेले आहे.
तिने “संवर्धन पर्यावरणाचे-रक्षण निसर्गाचे” या विषयावर आधारित निबंध लिहिलेला होता. यासाठी तीला विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका वर्षा अहिरराव यांचे मार्गदर्शन मिळाले तसेच तीचे विद्यालयाचे मुख्याध्यापक खंबायत सर,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केलेले आहे.