जळगाव – येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात (आरटीओ) ई-चलन चलन घोटाळा उघड आला आहे. कार्यालयातील लिपिकासह, एजंट व इतर ३५ जणांवर सुमारे अडीच लाखांचा अपहार झाल्याने रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे आरटीओ कार्यालयात लिपिक, एजंट व मालक यांनी बनावट दस्ताऐवज बनविले. त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करुन वाहनाच्या दंडाची रक्कम सरकारी तिजोरीत न भरता स्वत:च्या फायद्यासाठी वापर केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी लिपीक नागेश गंगाधर पाटील, एजंट सुलतान बेग मिर्झा, गणेश कौतिक ढेंगे यांच्यासह वाहन मालक अशा एकूण ३५ जणांविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहार व कट रचून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. २ लाख ३८ हजार १०० रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे.
आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ लिपिक प्रकाश रामराव पवार (५७, रा.नेहरु नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, मागील वर्षी सप्टेबर २०१९ मध्ये नागेश पाटील हे खटला विभागात लिपीक म्हणून कार्यरत असताना वायु वेग पथकाचे मोटार वाहन निरीक्षक श्रीकांत महाजन यांनी रस्त्यावरील वाहन तपासणीदरम्यान मनसूर खान मेहबूब खान (रा.भुसावळ) याचे वाहन (क्र.एम.एच.१९ बी.एम.५९९५) अडविले होते.
यात कनिष्ठ लिपिक नागेश गंगाधर पाटील, वाहन मालक मनसूर खान मेहबूब खान, समाधान भागवत पाटील, भरत हिंमत चौधरी, एकनाथ पांडे, फकिर शाहरुख शहा खलील शहा, प्रो.प्रभंजन ऑटो, जगदीश काशिनाथ माळी, मजित खान बशिद खान, शिकलगरे, मो. शरिफ मो.याकूब बागवान, सूर्यकांत गोबा कोळी, अशोक नामदेव कोळी, प्रवीण व्यंकटेश हिलगोळे, कैलास नारायण पाटील, सचिन सोमनाथ सरदार, शिवराम जयराम माळी, विशाल नामदेव मुसळे, वासुदेव ज्ञानेश्वर बोबडे, रमेश दशरथ भंगाळे, मोतीलाल सदाशिव दिक्षीत, विनोद प्रल्हाद बडगुजर, सुनील सुखदेव गढे, बापू आनंदा पाटील, विजयसिंग महाजन,याच्या सह आदी संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
अजून वाचा
जळगावात पुन्हा खून; 25 वर्षीय तरुणाची हत्या