जळगाव – शहरातील शिवाजी नगर भागातील इंद्रप्रस्थ नगर परिसरात खडके चाळ शाळा जवळ दरम्यान भूषण भरत सोनवणे वय २५ याच्यावर कुणीतरी अज्ञाताने धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केल्याची घटना रविवारी रात्री 10.45 वाजेच्या सुमारास घडली आहे. मारेकऱ्यांमधील तीन संशयितांना ताब्यात घेतल्याचे समजते.
भूषण यास तातडीने रूग्णालयात हलवण्यात आ
ले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मयत तरुणाचे नाव भूषण भरत सोनवणे (वय 25) रा. इंद्रप्रस्थ नगर परिसरातील हरिओम शांती नगर येथिल रहिवासी आहेत. शहर पोलिस स्थानकाच्या हद्दीतील गेल्या तीन दिवसांतील ही दुसरी खुनाची घटना आहे.
घटनास्थळी मोठी गर्दी जमली असून पोलीस देखील पोहोचले आहेत. मयत भूषण सोनवणे यांच्या पश्चात लहान भाऊ, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा हे घटनास्थळी दाखल झाले.