जळगाव- भाजपाच्या केंद्र सरकारने बहुमताच्या जोरावर शेतकरी विरोधात काळे कायदे संमत केले. त्याविरोधात अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार सदर कायद्याच्या विरोधात जोरदार मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून जळगांव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने ट्रॅक्टर रॅली चे आयोजन करण्यात आले आहे.
ही रॅली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास दादा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली दि.०९ नोव्हेंबर २०२० सोमवार राेजी दुपारी २.०० वाजता, काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथून निघणार आहे. अशी माहिती एन एस यू आय चे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी दिली आहे.