Monday, February 16, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान

by Divya Jalgaon Team
September 8, 2022
in जळगाव, सामाजिक
0
आचार्यश्री पूज्य जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सवात तपस्वींचा सन्मान

जळगाव – आचार्य सम्राट 1008 पूज्य श्री जयमलजी म. सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाच्या (Acharya Samrat 1008 Pujya Shri Jaymalji m. Sa. His 315th birth anniversary) पार्श्वभूमीवर आज जैन हिल्स येथे 130 तपस्वीचा सामुहिक सन्मान करण्यात आला. कस्तूरचंदजी बाफना, शंकरलालजी कांकरिया, अजय ललवाणी, सुशिल बाफना, सौ. निशा जैन, सौ. शोभना जैन, डॉ. भावना जैन, ममता कांकरिया यांच्याहस्ते तपस्वींचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थितीत आचार्यांनी सर्व तपस्वींना साधुवाद दिला. जैन हिल्सच्या आकाश मैदानावर सुरू असलेल्या भव्यातिभव्य जन्मोत्सव समारोहप्रसंगी भारतभरातील श्रावक-श्राविका सहभागी झाले होते.

श्री. वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ जळगाव, श्री. अखिल भारतीय श्वेताम्बर स्थानकवासी जयमल जैन श्रावक संघ, ऑल इंडिया जे. पी. पी. जैन महिला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत श्री. जयमलजी म.सा. यांच्या 315 व्या जन्मोत्सवाप्रसंगी जयगच्छाधिपती व्याख्यान वाचस्पती, वचन सिद्ध साधक उग्र विहारी, बारावे पट्टधर वर्तमान आचार्य प्रवर 1008 प.पू. श्री पार्श्वचंद्रजी म. सा, एस. एस. जैन समणी मार्गचे प्ररंभ कर्ता अनुप्पेहा ध्यान प्रणेता प्रवचन प्रभावक डॉ. श्री पदमचंद्रजी म.सा, विद्याभिलाषि जयेंद्रमुनीजी म.सा, सेवाभावी जयशेखरमुनिजी म.सा., मौनसाधक श्री. जयधुरंधरमुनिजी म.सा. विद्याभिलाषी श्री जयकलशमुनीजी म.सा., तत्वरसिक श्री जयपुरंदर मुनीजी म.सा ठाणा 7 यांच्यासह समणी प्रमुखा डॉ. सुयश निधीजी हे विराजमान होते. त्यांचा उपस्थीतीत चातुर्मासाचा कार्यक्रम सुरू आहे. एक भवावतारी आचार्य सम्राट श्री जयमलजी म.सा. यांचा 315 वा जन्मोत्सव जळगाव येथे साजरा होत आहे.

मुख्य प्रवचनामध्ये डॉ. पदमचंद्रजी म.सा. यांनी ‘जैन’ शब्दाची व्याख्या सांगितली. जैन म्हणजे प्रत्येक सजीवाला जोडून ठेवणारा असतो. आचार्यांनी तेच कार्य केले असून त्यांच्या जन्मोत्सवाच्यानिमित्त एक संकल्प केला पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे. आचार्यांनी सांगितेला मार्ग त्यांचे साहित्य जपले पाहिजे. ज्यांची संस्कृती व साहित्य पुढील पिढी संस्कारीत करते तेच इतिहास घडवित असतात आचार्यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणे म्हणजे जैन होय. जैन हिल्सवरील पडीक जमिनीवर नंदनवन फुलविणारे ऋषभदेवतेचा संस्कारातून जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणाऱ्या भवरलाल जैन यांचे जीवन संघर्षमय होते. मात्र संघर्षातून जैनत्व सिद्ध करता येते आणि जैन समाजाचा गौरव वाढविता येतो हे त्यांच्या आचरणात दिसते ही शिकवण घेऊन आपल्या आयुष्यात आचरण करावे, स्वच्छता आणि स्वयंशिस्तीच्या आचरणात आनंदानुभूति मानावी हा संस्कार आचार्य जयमलजी म.सा. यांनी दिला असून त्या मार्गावर चालावे असेही यावेळी डॉ. पदमचंद्रजी म.सा. म्हणाले.

यावेळी मौनसाधक श्री. जयधुंरधरमुनिजी म.सा. यांनी उपस्थित श्रावक-श्राविका यांना आचार्य जयमलजी यांच्या विचारांवरच मोक्ष प्राप्त होतो. दुसऱ्यांसाठी क्षमाहित ठेवले पाहिजे हिच शिकवण गुरूंनी दिली असून आचार्यांनी दाखविलेल्या मार्गावर मार्गस्थ झाले पाहिजे असे मौनसाधक म्हणाले.

Share post
Tags: # जन्मोत्सव#Acharya Samrat 1008 Pujya Shri Jaymalji m. Sa. His 315th birth anniversary
Previous Post

पूज्य जयमलजी म.सा. यांच्या जीवनचरित्राची नाटिकेतून अनुभूती

Next Post

पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Next Post
पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

पोलीस कुटुंबीयांच्या समस्या वाढल्या महीलांनी दिले तहसीलदारांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group