जळगाव – शिवसेनेतील लक्षणीय मोठया फुटी नंतर डेमेज कंट्रोलसाठी युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे प्रथमच आज जिल्हा दौऱ्यावर येत आहे, मात्र या दौऱ्याच्या तयारीच्या अंगाने विचार करता कोणतेही प्रभावी नियोजन दिसून येत नाही, विशेषतः जळगाव शहर अथवा जिल्हा शाखेच्या पातळीवर ते अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. वास्तविक हा दौरा म्हणजे अस्तित्व दाखविण्यासह बंडखोर आमदारांना आव्हान ठरावे, अशा स्वरूपाची, आखणी व नियोजन सर्व सामान्य मूळ शिवसेना प्रेमी जनते ला अपेक्षित होती, मात्र तश्या पद्धती ची तयारी दिसत नसल्याचे चित्र आहे. प्रभावी नेत्या चा अभाव म्हणून ही स्थिती असावी. दौऱ्याच्या प्रसिद्धी संदर्भात ही, फारशी लक्षवेधक प्रसिद्धी दिसून येत नाही. त्यामुळे या दौऱ्याची फल:निष्पत्ती ची उत्सुकता जिल्ह्याच्या जनतेत दिसून येत आहे.