जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात आम्ही नुकतीच 50 थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांनी बरोबर वक्तव्य केला आहे त्यांनी जर 50 तर यांचे दहीहंडी फोडली नसती तर राज्यात सत्तांतरण झाले नसते असे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उद्या जळगाव जिल्हा दौरा आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता त्यांचे पक्षाचे काम आहे त्या कामासाठी ते येत आहे. त्यांना येऊ द्या पक्षाचे काम करू द्या असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यावर व्यक्त केल आहे.


