जळगाव – राष्ट्रीय महामार्गावरील गोदावरी कॉलेज चौकात वाद मिटवत असताना दोन जणांना चाकू हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली होती. या गुन्ह्यातील तीन जणांना एमआयडीसी पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली.
दीपक उर्फ दप्तऱ्या संजय साळुंखे (वय २३, रा. प्रजापतीनगर), शैलेश उर्फ गोलू शंकर चौधरी (वय १९, रा. सम्राट कॉलनी), गोलू भास्कर सोनार (वय २३, रा. लक्ष्मीनगर, तांबापुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तिघांवर एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी करीत आहे.