जळगाव – नाशिक विभागीय स्तरावरील आंतर शालेय १४ वर्षा आतील मुलांच्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे सुरुवात झाली असून मंगळवारी या स्पर्धेचे उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एल पी देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित व फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांची उपस्थिती होती.
पारितोषिक वितरण समारंभ
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपअधीक्षक (गृह) संदीप गावित यांच्या हस्ते व जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली तसेच निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सरवनकर मुंबई, फुटबॉल संघटनेचे सचिव फारुक शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
विजयी, उपविजय संघ व खेळाडूंना पारितोषिके
या स्पर्धेतील विजयी व उपविजेते संघास चषक तसेच संघातील खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक देऊन स्पोर्ट्स हाऊस जळगाव व जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे गौरविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे विजयी, उप विजयी व तृतीय संघास प्रमाणपत्र देण्यात आले.
स्पर्धेतील पंच
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्वात निखिल पाटील,सुरज सपके,अमेय तळेगावकर,हर्षद शेख,कौशल पवार, वसीम शेख,सनी कोळी,मनीष कोळी अल्तमस खान,नीरज पाटील,कुलदीप पाटील यांनी पंचाची कार्य उत्कृष्टरित्या पार पडली.