जळगाव – स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त देशभरात साजऱ्या होणाऱ्या अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा मोहीमेची जनजागृती करण्यासाठी बाईक रॅली इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते हीरवा झेंडा दाखवुन करण्यात आली.
देशभरात तिरंगा मोहीम साजरी होत असल्याने इकरा युनानी मेडिकल कॉलेज तर्फ़े लोकांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत करणे तिरंगा बद्दल आदर निर्माण करण्यासाठी कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले.
या मध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहम्मद अब्दुल कुद्दुस, उप-प्राचार्य डॉ. शोएब शेख, डॉ. इकबाल शेख, डॉ. नसीम अन्सारी, डॉ. अजिम काझी, डॉ. अनिस शेख, डॉ. जाकीर खान. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , हॉस्पिटल स्टाफ़, महाविद्यालयाचे विद्यार्थी, इकरा बी.एड. कॉलेजचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी आणि इकरा डिएड कॉलेजचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी या सर्वांच्या वाहनांवर तिरंगा लावुन महाविद्यालया पासुन सुरुवात करुन डिमार्ट, काव्यरत्नावली चौक, आकाशवाणी चौक, तांबापुरा असे शहरात 10 km बाईक रॅली काढण्यात आली.
लोकांना आव्हान करण्यात आले कि त्यांनी आपापल्या घरी तिरंगा फ़डकावुन स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरे करावे. या उतस्वात प्रत्यकाने 13 ते 15 ऑगस्ट पर्यंत त्यांचे घर तसेच दुकान आस्थापनांमध्ये तिरंगा लावावे.
महाविद्यालयात विद्यार्थी व विद्यार्थींची तिरंगा रॅली पुर्ण महाविद्यालायाच्या परिसरात काढण्यात आली. या मध्ये महाविद्यालयाच्या शिक्षिका उपस्थित होते. त्यांनी हर घर तिरंगा अभियाना साठी जोरजोरात घोषणा दिल्या व मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आझादी क अमृत महोतस्व निमित्त केलेले आव्हानामध्ये मोठया उत्साहाने सहभाग घेतले.