चोपडा – आषाढी एकादशीनिमित्त श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने संत श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरावर आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.
यावेळी विठ्ठल रुक्माई यांच्या प्रतिमेला प्रदेश तेली महासंघ जळगाव जिल्हा अध्यक्ष के. डी. चौधरी, चोपडा तेली समाजचे उपाध्यक्ष टी.एम. चौधरी यांनी पूजन,मल्यार्पन करून वंदन केले. तसेच संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीची पूजा करून माल्यार्पण करण्यात आले. सुरुवातीला हरिपाठ म्हणून आरती करण्यात आली.
यावेळी समाजरत्न टी. एम. चौधरी यांनी मान्यवरांचा सत्कार केला. महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष देवकांत के. चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या परिवहन सेलच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेचे विश्वस्त श्री नारायण पंडित चौधरी हे सपत्नी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री यमुनोत्री अशी तीर्थयात्रा करून आल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच श्री के.डी. चौधरी, श्री मुकुंदा चौधरी द्वारका धाम यात्रा जात असल्याने त्यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.