जळगांव – भारत सरकार यांचेकडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत दि.13 ऑगस्ट, 2022 ते दि.08 सप्टेंबर, 2022 या कालावधीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील मैदानावर सैनिक भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदरील सैनिक भरतीमध्ये औरंगाबाद, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड व परभणी या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील भरती प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुणांनी भरतीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
“अग्निपथ” योजनअंतर्गत 1)अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी) (All Arms) 2) अग्निवीर ट्रेड्समन 10 वी पास (All Arms) (chef stewsrd,washer man, Hair dresser, support staff,tailor) 3) अग्निवीर ट्रेड्समन (All Arms), 8 वी पास (हाऊस किपर व मेस किपर) 4) अग्निवीर टेक्निकल (All Arms) 5) अग्निवीर लिपीक, स्टोअर किपर टेक्निकल (All Arms), या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून त्याचा विस्तृत तपशिल www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून उमेदवारांनी सदरचा संकेतस्थळावर नमूद केलेल्या INDIAN ARMY RALLY NOTIFICATION 2022-23 मध्ये दिलेल्या सूचना, अर्ज स्विकारण्याची पद्धत, आवश्यक अर्हता, वयोमर्यादा, निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया इत्यादी बाबीचे अवलोकन करावे.
तसेच दिनांक 01 जुलै 2022 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून दिनांक 30 जुलै 2022 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. उमदेवारांना परीक्षेबाबत प्रवेशपत्र दिनांक 07 ते 11 ऑगस्ट, 2022 या कालावधीत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच सदरच्या भरती प्रक्रिये करीता उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वय 17 ½ ते 23 वर्ष असून वर्ष 2022-23 साठी एक वेळ उपाय म्हणून Upper age limit 21 वर्षावरुन 23 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आलेली आहे.
तरी भारत सरकार यांचकेडील “अग्निपथ” योजनेअंतर्गत सैनिक भरती मेळाव्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा याकरीता जिल्हादंडधिकारी जळगाव यांचेकडून जाहिर आवाहन करण्यात येत आहे.