जळगाव – पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत वाळूचोरी करुन पळून जाणारे ट्रॅक्टर मिळून आले. तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने ४ जुलै रोजी रात्री पोलिस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती.
या वेळी चंदुअण्णानगर परिसरातून जात असलेल्या एमएच २८ डी ६६८९ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक होत असल्याचे दिसून आले. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नव्हता. पोलिसांनी तीन हजार किमतीची वाळू व एक लाखांचे ट्रॅक्टर जप्त केले. अनिल फेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक प्रमोद भिकन सपकाळे (रा. कांचननगर) याच्या विरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून विजय पाटील तपास करीत आहे.