अमळनेर प्रतिनिधी – बांधकामाच्या साईटवर शॉक लागून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी १२ वाजता, शहरातील ढेकूरोडवरील जिजाऊ नगरात घडली.
हेडावे येथील नंदकिशोर अशोक पाटील हा युवक जिजाऊ नगरात बांधकाम साईटवर इलेक्ट्रिक मशिनने आसारी कापत होता. त्यात त्याला शॉक लागल्याने तो बेशुद्ध झाला. खासगी रुग्णालयात दाखल केले असता तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याप्रकरणी अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली.