जळगाव – जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, आणि टेमासेक–मालकीच्या रीवूलीस पीटीई लिमिटेड., सिंगापूर यांनी जैन इंटरनॅशनल ट्रेडिंग बी.व्ही. (जैन इरिगेशनची संपूर्ण मालकी असलेली उपकंपनी) आणि रीवूलीस यांच्यात निश्चित व्यवहारिक करार केला आहे.
जैन इरिगेशनचा इंटरनॅशनल इरिगेशन बिझनेस (“आय.आय.बी.”) यापुढे रीवूलीसमध्ये विलीन करून जागतिक सिंचन आणि हवामान महासत्ता तयार केली जाईल, जी जगातील सगळ्यात मोठी दुसऱ्या क्रमांकाची असेल आणि ज्याचा महसूल ७५० दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयात 5800 कोटी) इतका असेल. या रोखी आणि स्टॉक व्यवहारातून पुढील गोष्टी साध्य होतील.
या व्यवहारात रोख रकमेचा उपयोग जैन इरिगेशनचे एकत्रित कर्ज ४५% ने कमी करण्यासाठी केला जाईल, ज्याद्वारे जैन इरिगेशनच्या एकत्रित कर्जात 2664 कोटी रूपयांची घट होण्यास मदत होणार आहे. ज्यात २२५ दशलक्ष यु.एस. डॉलर्स (भारतीय रूपयांत 1757 कोटी) पर्यंतच्या सर्व पुनर्रचित विदेशी बॉन्डचा आणि आय.आय.बी. समाविष्ट असलेल्या विदेशी ऑपरेटिंग कंपन्यांच्या संपूर्ण कर्जाचा समावेश आहे. विलीन झालेल्या संस्थेत जैन इंटरनॅशनल बिझनेस २२% ची भागीदारी कायम ठेवेल आणि राहीलेली ७८% टेमासेक कडे असेल. जैन इरिगेशनने बॉण्डधारक व आय.आय.बी कर्जदारांना दिलेली २,२७५ कोटी रुपयांची कॉर्पोरेट हमी देखील सोडवण्याची संधी जैन इरिगेशनला मिळेल. विलीन झालेल्या संस्थेसोबत जैन इरिगेशनचा दीर्घकालीन पुरवठा करार असेल. यामुळे महसूल आणि नफा वाढण्यास मदत होईल. विलीन झालेली संस्था प्रख्यात जैन ब्रँड्सचा वापर आणि प्रचार लक्षणीय उपस्थिती, मागणी, मूल्य असलेल्या मार्केट्समध्ये सुरू ठेवेल.
प्रशासनाच्या दृष्टीने, कंपनीच्या संचालक मंडळावर जैन इरिगेशनचे प्रतिनिधी संचालक व निरीक्षक असतील आणि सूक्ष्म सिंचनातील त्यांच्या कौशल्याचा उपयोग कंपनीच्या वाढीस मदतीचा ठरेल. जागतिक सिंचनक्षेत्रात जैन इरिगेशन संभाव्य भावी मूल्य निर्मिती राखून ठेवेल. तसेच जैन इरिगेशन जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिंचन बाजारपेठांपैकी एक असलेल्या भारतीय व्यवसायात आणखी सुधारणा करेल. यातून व्यवसायाचा विस्तार होऊन नफा वाढविण्यावर लक्ष केंद्रित करेल. या कराराद्वारे अलीकडील पुनर्गठनात आर्थिक संघटनांशी सहमती केल्यानुसार भारतीय व्यवसायाच्या ताळेबंदावरील कर्ज कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
विलीगीकरणाची ठळक वैशिष्ट्ये –
-
७५० दशलक्ष यु. एस. डॉलर्स महसूल असणाऱ्या या एकत्रिकरणाचा मार्केट विस्तार सहा महाद्वीप व ३५ देशांमध्ये नावीन्यता, डिजिटल तंत्रज्ञान व शाश्वता यावर आधारित असेल.
-
जागतिक गुंतवणूक कंपनी टेमासेकने यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये रीव्युलीस मधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले आणि मार्च २०२२ मध्ये पूर्ण मालकी स्वीकारली.
-
हा व्यवहार म्हणजे आंतराष्ट्रीय आणि भारताच्या ताळेबंदातील कर्ज लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी (डीलिव्हरेजिंग ऑफ बॅलेन्सशीट) आणि वेगाने वाढणाऱ्या भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याच्या जैन इरिगेशनच्या प्रयत्नातील दुसरा टप्पा आहे.
कोट