जळगाव – गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षा प्रमाणे याही वर्षी ‘मृगोत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात ‘मौसम की बारीश’, ‘वारा गाई गाणे’, बरसो रे मेघा या सारख्या गीतांनी रसिक चिंब झाले. या गितांना मन प्रसन्न करणारे नृत्य व हार्मानियम आणि तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने ‘मृगोत्सव’ उत्तरोत्तम बहरत गेला.
गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने दि.18 जून 2022 रोजी सायं.6.30 वा कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फउंडेशनचे अध्यक्ष मा. डॉ. उल्हास पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती गोदावरीआई पाटील संचालिका डॉ. वर्षा पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. केतकीताई पाटील उपस्थित होते. गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. पद्मजा नेवे, कथक विभाग प्रमुख डॉ. महिमा मिश्रा, श्री. प्रविण महाजन, श्री.देवेंद्र गुरव, श्री.सुशिल महाजन, केद्र व्यवस्थापक श्री.राजु पाटील व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ‘आता तरी देवा मला पावशील का’ या गीताने झाली हे गीत खुशी वाणी, आर्या सोनार, कनकश्री अय्यंगार, मंजिरी जोशी, आर्या जोशी, लावण्या दहाड, सानवी रेवतकर, खुशीता कोल्हे, पेहेल छाजेड, रचित मकडिया, लावण्या पाटील या चिमुकलींनी सादर केले, तर पद्मश्री ना.धो. महानोर यांचे शब्द असलेले ‘घन ओथंबुन येती’ हे गीत किरण सोनी, अनिता सुर्यवंशी, निकिता जोशी, सुरेखा चौधरी, स्मीता पाटील, सुनिता विसपुते या सर्व महिलांनी त्यांच्या गाण्यातून शिकायला वय नसतं हे जणू दाखवून दिल.
तर मन प्रसन्न करणारा राग यमन रा रागातील प्रसिद्ध पारंपारीक बंदिश ‘येरी आली पिया बीन’ यात बंदिश, तान, सरगम गीत, तिहाई, व तराणा – वर्षा कुलकर्णी, भाग्यश्री वानखेडे, साक्षी वाणी, वैष्णवी जोशी, चेतना पाटकरी, संध्या फासे, शीतल जोशी, संहिता जोशी यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली.
_ यानंतर कथक विभागाच्या छोटयाश्या नृत्यंगना सुंदर असे नृत्य ‘बरसो रे मेघा मेघा’ या गाण्यावर रिया वर्मा, छवी शिंपी, सांची ननवरे, दुर्वा भारुडे, लावण्या पाटील, ओवी नारखेडे, लावण्या दहाड यांनी नृत्य सादर करुन जणू काही पावसातच भिजत असल्याचा सुखद अनुभव दिला.
या सुंदर नृत्यांनतर वादन विभागाचे विद्यार्थ्यांनी राग भिमपलास हार्मानियमवर अनुष्का शर्मा, तन्मय पांडे, गौरव पटेल, राघव दहाड यांनी सादर केला. तर ‘जब दिप जले आना’ हे गीत प्रणव ईखे यांनी तर कथक विभागाच्या लिटील स्टार कनकश्री अय्यंगार, खुशी वाणी यांनी ‘मौसम की बारीश’ हे सरेल नृत्य सादर केले. तर तर गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘वारा गाई गाणे’,’जब दिप जले आणा’, ‘वादळ वारं सुटलंग’, हे गीत अनुक्रमे निकीता जोशी, वैष्णवी जोशी, भाग्यश्री वानखेडे, यांनी सादर केले. शास्त्री संगीतावर आधारीत काही राग हे ऋतु प्रधान आहेत. असाच वर्षा ऋतुवर आधारीत मल्हार रागातील ‘बोले रे पपीहरा हे गीत वर्षा कुलकर्णी यांनी सादर केले.
_ कथक विभागातील मयुरी चौधरी, सिध्दी नारखेडे, अपूर्वा अत्तरदे यांनी ‘छायी बरखा बहार’ हे बहारदार नृत्य सादर करुन रसिकांची मने जिंकली. तसेच ‘सुरीली अखियों वाले’ हे गीत प्रणव ईखे, शिवम कुलकर्णी गीटार वादनासह यांनी आपल्या मधुर आवाजात सादर केले.