मेष:- जास्त लोकांशी संपर्क वाढेल. रागात कोणते ही कामे करू नये. शेतीच्या कामात लक्ष ठेवावे. कोणते ही कार्य करतांना लक्ष ठेवावे.
वृषभ:- काही बोलतांना जपून बोलावे. जोडीदाराच्या इच्छानुसार कार्य करावे. ओळखीच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन:- कामात सहकाऱ्यांची साथ मिळेल. कामात दिरंगाई करू नका. सामाजिक कार्य करतांना लक्ष ठेवावे .
कर्क:- कोणावर ही जास्त विसंबून राहू नये. मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्यात येईल. रेस. सट्टा यात लाभ मिळण्याची शक्यता आहे.
सिंह:- मित्र-मैत्रिणींचा फड जमवाल. आवडत्या ठिकाणाला भेट देण्याचे ठरवाल. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घरगुती कामात दिवस जाईल. हाताखालील नोकरांचे सहकार्य लाभेल.
कन्या:- जवळचा प्रवास मजेत पार पडेल. छंद जोपासला वेळ मिळेल. मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. बाहेरील अन्न पदार्थ खाणे टाळावे. महत्त्वाची कागदपत्रे पुढे सरकतील.
तूळ:- जोडीदाराच्या हट्टाला बळी पडाल. आवडते पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. क्षुल्लक गोष्टींमुळे येणारा राग कमी करावा. नवीन ठिकाणी गुंतवणुकीला वाव आहे.
वृश्चिक:- जोडीदाराच्या इच्छेविरूद्ध जाऊ नका. कौटुंबिक वातावरण तप्त राहील. कामाचा विस्तार वाढवता येईल. भागीदारीत तुमच्या विचाराला प्राधान्य राहील. व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावा लागेल.
धनू:- इच्छेला मुरड घालावी लागेल. भावंडांशी वाद वाढवू नयेत. जुन्या कामात अधिक वेळ गुंतून पडाल. जोडीदाराच्या बुद्धिकौशल्याचे आश्चर्य वाटेल. काटकसरीवर भर द्यावा.
मकर:- नातेवाईक तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात. इतरांच्या अविश्वासाला बळी पडू नका. कोणाचाही सल्ला घेताना सावध राहा. अविचाराने वागून चालणार नाही. घेतलेल्या कष्टाचे चीज होईल.
कुंभ:- रागाच्या भरात कोणते ही कार्य करू नये. अचानक डोकेदुखीचा त्रास होईल. कामात व्यस्त राहावे. कुटूंबात तुमच्या दबदबा राहील.
मीन:- मोठ्यांच्या आशीर्वाद मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. प्रवास करण्याचा लाभ मिळेल.