जळगाव – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या सभागृहात आज ३० वा दीक्षांत समारंभ कार्यक्रम पार पडला त्यात पीएचडी, एमए, बीए, बीएस्सी पदवी प्रदान करण्यात आलीआहेत.
ज्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी आणि नॅक समिती बंगळूर चे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू विजय माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आले.
खान हमेरा अय्युब खान या विद्यार्थीनीने बॉटनी या विषयात सुवर्ण पदक पटकावले तर कौसर बी नियाज-उद्दीन शेख हिने बी.ए. उर्दू मध्ये सुवर्णपदक पटकावले. त्याच बरोबर प्रोफसर कहकशां खान यांना उर्दु मधे पी.एच.डी.प़दान करण्यात आली.
या यशाबद्दल इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम, डॉ.इकबाल शाह, प्राचार्य इब्राहिम पिंजारी, डॉ.राजेश भामरे, डॉ.चांद खान, डॉ.अमिनोद्दीन काझी, डॉ.फिरदौस शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्याच प्रमाणे महाविद्यालया तील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही त्यांचे हार्दिक अभिनंदन केले.