जळगाव – विद्यापीठ विकास मंचच्या नवीपेठेतील छात्रशक्ती कार्यालयातील मंचच्या नवीन कार्यालयाचे मंगळवार सायंकाळी ५ वाजता होणार आहे. महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन होईल.
अध्यक्षस्थानी विद्यापीठ विकास मंचचे प्रदेश सचिव डॉ. गजानन सानप असतील. प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठातील मानव्य विज्ञान व आंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. अशोक राणे असतील, असे सिनेट सदस्य नितीन ठाकूर, मनीषा खडके यांनी कळवले आहे.