जळगाव – इंद्रप्रस्थनगरातील एका घरातून चोरट्याने भरदिवसा तीन मोबाइल लंपास केले. ही घटना २० मे रोजी दुपारी २.१५ वाजता घडली. विजय तुकाराम पाटील यांच्या घरात ही चोरी झाली.
२० मे रोजी दुपारी पाटील कुटंुबीय घरात असताना दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरटा घरात शिरला. चोरट्याने २८१०० रुपये किमतीचे तीन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय निकुंभ तपास करीत आहे.


