जळगाव – आजारपणाला कंटाळून ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन विलास बाबूराव महाजन (वय ३५, रा. खोटेनगर)आत्महत्या केली.
खोटेनगर परिसरातील झाडाखाली विलास महाजन हा राहत होता. गेल्या अनेक दिवसांपासून तो आजारीदेखील होता. आजारपणाला कंटाळून विलास याने ज्याठिकाणी राहत होता त्याच ठिकाणावरील झाडाला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना त्या परिसरातील रिक्षाचालकांच्या लक्षात आली.
त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, वासुदेव सोनवणे, सतीश हाळनोर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणला. मृत विलास याच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.