जळगाव प्रतिनिधी – मुक्ताईनगरजवळ गेल्या आठवड्यात झालेल्या अपघातात धनराज सुरेश सोनार (शिवाजीनगर, जळगाव) या तरुणाचा मृत्यू झाला हाेता. त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या पत्नीला जिल्हा दूध संघात कायमस्वरुपी नाेकरी द्यावी अशा विविध मागण्यांसाठी साेनार समाजाच्या विविध संघटनांतर्फे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सुवर्णकार सेना जळगाव जिल्हा, अहिर सुवर्णकार समाज महिला मंडळ, संत नरहरी सोनार बहुउद्देशीय मंडळ मेहरूण, चिंतामणी फाउंडेशन यांच्यातर्फे हे निवेदन देण्यात आले.
नगरसेविका रंजना वानखेडे, संजय विसपुते, विजय वानखेडे, संगिता विसपुते, राजश्री पगार, सुवर्णा बागुल, रुपाली वाघ, राजेश बिरारी, नितीन सोनार, मनोज सोनार, उमेश वडनेरे, राजेंद्र विसपुते, रमेश सोनार, अरुण वडनेरे, जगदीश देवरे, राजेंद्र दुसाने, शरद दंडगव्हाळ, विनोद दंडगव्हाळ, केतन सोनार, संजय पगार, लोटन भामरे, सागर बागुल, उमेध विसपुते, सुधाकर दुसाने, भगवान सोनार, सुरेश सोनार, प्रकाश बाविस्कर, बाळकृष्ण दुसाने, मयूर दुसाने, विपुल चव्हाण, उमेश सोनार उपस्थित हाेते.