जळगाव – शहरातील निवृत्तीनगरात एक बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने, रोकडसह दुचाकीदेखील लांबवली. १३ मे रोजी ही घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अविनाश वसंतराव साळुंखे (वय ५१) यांच्या घरी चोरी झाली आहे. साळुंखे हे शाळेत शिक्षक आहेत. पाच मे रोजी सकाळी ६.३० वाजता साळुंखे कुटुंबीय कामाच्या निमित्ताने बाहेरगावी गेले. यानंतर त्यांचे बंद घर फोडून चारेटट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने, १० हजाराची रोकड व दुचाकी असा एकुण ५४ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. टीव्हीजवळ ठेवलेल्या दुचाकीची चावी मिळाल्यामुळे त्यांनी दुचाकी देखील लांबवली. याबाबत १३ मे रोजी साळुंखे कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. यानंतर साळुंखे यांनी दिलेल्याा फिर्यादीवरून जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.