Tuesday, February 17, 2026
Divya Jalgaon
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय
No Result
View All Result
Divya Jalgaon
No Result
View All Result

भोकर येथील बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे ठार मरणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप

by Divya Jalgaon Team
May 9, 2022
in गुन्हे वार्ता, जळगाव
0
भोकर येथील बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून जीवे ठार मरणाऱ्याला मरेपर्यंत जन्मठेप

Judge and gavel in courtroom court

जळगाव – भोकर ता. जि. जळगाव येथील अल्पवयीन बालकाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर खून केल्या प्रकरणी डांभुर्णी ता. यावल येथील आरोपीला मरे पर्यंत दंडासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डांभुर्णी गावातील मुलीचे लग्न भोकर गावातील मुलाशी दि.१२ मार्च २०२० रोजी गावात लागणार होते त्यादिवशी मुलीकडून आलेल्या पाहुण्यात आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील हा सुद्धा भोकर गावी आलेला होता. तेव्हा त्याची गावातील अकरा वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख होऊन त्याला तो गावातील शेतात शौचालयास जायचे म्हणून घेऊन गेला व त्याठिकाणी त्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करून त्या मुलाला मारून टाकले. खूप वेळ होऊन ही अल्पवयीन मुलगा घरी आला नाही म्हणून त्याच्या वडिलांनी तालुका पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद केली. चार दिवसानंतर दि. १६ मार्च २०२० रोजी त्या मुलाचे प्रेत आढळून आल्याने आरोपीचा शोध घेतल्यावर आरोपी यश उर्फ गोलु चंद्रकांत पाटील याने अनैसर्गिक अत्याचार केल्यानंतर खून केला असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे त्याला अटक करण्यात आली.

तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांनी गुन्ह्याचा तपास करून दि. १० जून २०२० रोजी सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. त्यावेळी आरोपी विरुद्ध गुन्हा सिध्द होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांच्याकडे एकूण १२ साक्षीदार तपासले.

यात प्रामुख्याने गावातील त्या दिवशी बर्फाचा गोळा विकणारा अनिल भोई, डॉ. निलेश देवराज,लक्ष्मण सातपुते – ना.तहसीलदार व इतर पंच यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या तसेच खटल्याचे कामी जिल्हा सरकारी वकील यांनी न्यायालयाच्या युक्तिवादातून मांडलेल्या सर्व पुराव्यावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जी.ठुबे यांनी आरोपीला दोषी ठरवून यश उर्फ गोलू चंद्रकांत पाटील याला अल्पवयीन पीडित मुलगा यांच्यावरील अनैसर्गिक अत्याचार करून खून केल्या प्रकरणी आजन्म मरे पर्यंतची शिक्षा तसेच एक लाख पंधरा हजार रुपये दंडासह सुनावली. सदर खटल्यात सरकार पक्षाकडून जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी काम पाहिले.

Share post
Tags: #Abduction of a minor#Court news#Unnatural atrocities#अनैसर्गिक अत्याचारCrime news
Previous Post

यावल येथे तरुणाला गंभीर जख्मी करणारे तिघे पोलिसांचा ताब्यात

Next Post

निवृत्तीनगरात एकाचे बंद घर फोडले

Next Post
दुकानातील नोकरांनी चाेरला सव्वा लाखांचा माल

निवृत्तीनगरात एकाचे बंद घर फोडले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकीय
  • गुन्हे वार्ता
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • प्रशासन
  • संपादकीय

© 2020 Website managed by Tech Drift Solutions.

Don`t copy text!
Join WhatsApp Group